Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भरधाव वेगाने कारची धडक! शिक्षक दिलीप समर्थ गंभीर जखमी

धडक देऊन कारचालक पसार.

अहेरी, दि. १५ डिसेंबर:- अहेरी येथील भगवंतराव हायस्कुलचे शिक्षक दिलीप समर्थ हे दिनचर्या प्रमाणे महागाव रोडवर इविनिंग वॉक करून अहेरी कडे परत येत असतांना एका भरधाव कारने त्यांना जबर धडक देऊन तिथून पळ काढला. प्रत्यक्षदर्शनी असणारे म्हटले की, कार इतकी वेगात होती की, नंबर व कोणत्या कंपनीची गाडी आहे हेही समजू दिले नाही. सदर अपघात सोमवार 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास अहेरी – भुजंगरावपेठच्या मध्ये अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या राखीव जागेच्या फलक जवळील रस्त्यावर झाले.
शिक्षक दिलीप समर्थ व त्यांचे आशुतोष इंगोले नामक पार्टनर नेहमी प्रमाणे महागाव रोडवर इव्हीनिंग वॉक करून घराकडे परततांना मागून भरधाव वेगाने येणारी कार दिलीप समर्थ यांना जबर धडक देऊन तिथे न थांबता त्याच वेगाने पळून गेला. रस्त्याच्या अगदी डाव्या बाजूला (राँग साईड) आणि वेगाची तीव्रता लक्षात घेतले तर गाडी चालक दारूच्या नशेत थूल्ल असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे.
धडक इतकी जबर होती की, शिक्षक दिलीप समर्थ यांच्या उजव्या भागाच्या डोळ्याजवळ व डोळ्यावरील भुवया जवळ जबर मार लागला असून रक्ताची मोठी धारच लागली होती. घटनास्थळी सुद्धा रक्त मोठ्या प्रमाणात सांडले होते.
जखमी अवस्थेत असलेले शिक्षक दीपक समर्थ यांना अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश नामेवार गुड्डू ठाकरे, सुरेंद्र अलोणे यांनी उचलून गाडीत व्यवस्थितरीत्या बसवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. शिक्षक दीपक समर्थ यांचे प्राथमिक उपचार अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात झाल्यानंतर 108 रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.

Comments are closed.