Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी

शिस्तपालन समितीकडून कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई, 24 मे – काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीला 9 एप्रिल रोजी उत्तर मिळाले व या उत्तरावर समितीने चर्चा केली. देशमुख यांंनी आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्ल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आशिष देशमुख यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून त्यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.