Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऐकावं ते नवल.. विधवा सुनेला संपत्तीत वाटा मिळू नये म्हणून ५८ वर्षांची सासू झाली गर्भवती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली दि,२५ : सध्याच्या काळात स्वार्थीपणामुळे इतर लोकांचे नुकसान करण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. असाच प्रकार रविवारी आग्रामधील कौटुंबिक समुपदएशन केंद्रात समोर आला आहे. विधवा सुनेला आपल्या संपत्तीत वाटा द्यायला नको म्हणून सासू-सासऱ्यांनी मुलाला जन्म दिल्याचा आरोप सुनेने केला आहे.

आग्राच्या सैया भागात राहणाऱ्या एका महिलेचे चार वर्षांपूर्वी कमला नगरमधील एकुलता एक मुलगा असलेल्या घरात लग्न झाले. तिचा पती जिम चालवायचा, मात्र दोन वर्षांपूर्वी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर महिलेला मुल झाले नसल्यामुळे ती आपल्या माहेरी राहत आहे. यावेळी तिने आपल्या सासू-सासऱ्यांकडे संपत्तीत हिस्सा मागितला. पण त्यांनी हिस्सा देण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पोहचले. यावेळी महिलेने  सासरचे लोक तिला संपत्तीत हिस्सा देत नसल्याचा आरोप केला आहे. यावेळी तिने संपत्तीत हिस्सा देता येऊ नये म्हणून तिच्या सासूने वयाच्या ५८ व्या वर्षी गरोदर राहिली असल्याचेही म्हटले आहे. याचदरम्यान पाच महिन्यांपूर्वी वयाच्या ५८ व्या वर्षी महिलेच्या सासूने मुलाला जन्म दिला आहे. आता सासू-सासरे संपूर्ण संपत्ती मुलाच्या नावावर हस्तांतरित करतील, असा आरोप महिलेने केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कौटुंबिक समुपदेशन केंद्राच्या प्रभारी नीलम राणा या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले की, ही कौटुंबिक बाब आहे. सासूने मुलाला दिलेल्या जन्मावर सुनेचा आक्षेप असला तरी या प्रकरणी कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडून काहीही प्रतिक्रिया दिली जाऊ शकत नाही, असे राणा यांनी सांगितले आहे. तसेच सासूने नव्या वारसाला जन्म देण्याच्या निर्णयावर समुदेशन केंद्रातील लोकांनी मत व्यक्त करणे टाळले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नीलम राणा म्हणाल्या की, महिलेच्या सासऱ्यांनी कौटुंबिक समुपदेशन केंद्रात सांगितले की, गावात वडिलोपार्जित संपत्ती असल्यामुळे सुनेला गावात राहण्यास सांगितले होते, मात्र तिने राहण्यास नकार दिला आणि माहेरी निघून गेली. सासऱ्यांच्या आरोपावर बोलताना महिलेने सांगितले की, सासू-सासरे गावात राहायला सांगत होते, पण गावात सासऱ्यांचे वेगळे घर नसल्यामुळे मी तिथे राहण्यास नकार दिला. वडिलोपार्जित संपत्तीत घर बांधून दिल्यास राहण्यास तयार असल्याचे महिनेने सांगितले आहे. मात्र याबाबत दोघांमध्ये कोणताही करार झालेला नाही.

 

Comments are closed.