Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 2.5 लाखांत घर

एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील मुंबईतील झोपडीधारकांना अवघ्या अडीच लाखात घरं मिळणार आहेत.

0

मुंबईतील झोपडपट्टीधारकांना एक आनदाची बातमी आहे. मुंबईतील झोपडपट्टीधारकांना केवळ अडीच लाखांमध्ये घर देण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. पुनर्वसन सदनिकेच्या घरांची किंमत ही आता अडीच लाख निश्चित करण्यात आली आहे.

लोकस्पर्श न्यूस नेटवर्क

मुंबई, 26, मे –  मुंबईच्या झोपडीत अनेक पिढी वाढल्या, मोठ्या झाल्या. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न मात्र काही पूर्ण झालं नाही. मात्र आता या घराबाबत राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला, असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एक जानेवारी 2000 ते 1 जानेवारी 2011 या काळातील झोपडीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील झोपडीच्या बदल्यात झोपडीधारकांना सशुल्क घर मिळणार आहे. या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे.

मुंबईत झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. झोपडीच्या बदल्यात अवघ्या दोन लाख 50 हजार रुपयांत घर मिळणार आहे. शासनाकडून पुनर्वसन सदनिकेची किंमत अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो झोपडपट्टीवासियांच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.  त्याशिवाय या निर्णयामुळे झोपडपट्टी असलेल्या जागांचा विकास होणार आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.