Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

माजी पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 18 नोव्हेंबर :-  आज दिनांक १९ नोव्हेंबर, २०२२ रोजी वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री बिलोलीकर सर, से.नि. विभागीय वन अधिकारी तसेच  बावस्करसर, उप वन अभियंता हे होते. तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांनी माजी।प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी केली. प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास लाभलेले श्री बिलोलीकर सर, से.नि. विभागीय वन अधिकारी तसेच  बावस्कर सर, उप वन अभियंता, श्री आशिष घोनमोडे यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांचे जीवनाबद्दल, त्यांनी त्यांचे जीवनात केलेल्या अमुल्य कार्याबद्दल व देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महत्वाची माहिती सांगितली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी वनविभागातील वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व वनसंवर्धन अधिनियम १९८० असे महत्वाचे कायदे हे त्यांचे कार्यकाळतच अस्तित्वात आणून पर्यावरण संतुलनाचे अमुल्य अशी कामगिरी केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन तसेच आभार प्रदर्शन श्री राहुल काचमवार, लिपीक यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्वश्री रायपूरे, लेखापाल, संदिप कांबळे, प्रशांत साळवे लिपीक, गावळे, मेश्राम, गराडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.