Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयर्न वुमन, पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनाची घेतली शपथ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 19 नोव्हेंबर :-  आयर्न वुमन म्हणून ओळखल्या जाणा-या भारताच्या तिस-या व एकमेव पहिल्या महिला पंतप्रधान, मा. स्व. इंदिरा गांधी यांची जयंती महानगरपालिकेत मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. स्व. इंदिरा गांधी जयंतीनिमित्त शासनाच्या व महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार दीपक झिंजाड, उप-आयुक्त (कर व आरोग्य) यांनी स्व. इंदिरा गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. तसेच स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे असलेल्या स्व. इंदिरा गांधी यांचे अर्थ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

स्व. इंदिरा गांधी (१९ नॉव्हेंबर १९१७ -३१ ऑक्टोंबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिस-या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. त्या भारताच्या पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. पंतप्रधान असताना त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान अशी ओळख निर्माण केली. देशामध्ये आणिबाणी च्या काळात आणि ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये त्यांनी लष्करी कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यांनी भारताला प्रगती पथावर नेणारा निर्णय घेवून देशाला अणूशक्ती संपन्न बनविण्याचा प्रयत्न केला. १९९९ मध्ये बिबिसी ने आयोजित केलेल्या ऑनलाईन सर्व्हेक्षणामध्ये इंदिरा गांधींना वुमन ऑफ द मिलेनियम असा किताब प्रदान करण्यात आला. २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील शंभर शक्तीशाली महिलांमध्ये टाईम मासिकाने इंदिरा गांधी यांचा समावेश केला होता. देशाच्या विकासामध्ये त्यांचे कणखर नेतृत्व लाभल्याने त्यांना आयर्न वुमन सर म्हणून ओळखले जावू लागले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा देशासाठी काम करणाऱ्या एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले असून या निमीत्ताने सामूहिक राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना देशाचे स्वातंत्र आणि एकात्मता आबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करीन तसेच सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद शांततामय आणि संविधानिक मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न चालू ठेवीन अशी शपथ उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली. याप्रसंगी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बुशरा सय्यद, आरोग्य विभाग प्रमुख जे. एम. सोनावणे, प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी फैसल तातली, सोमनाथ सोष्टे, कार्यालयीन अधिक्षक मकसुम शेख, कैलास पाटील इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा…

Comments are closed.