Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रेल लिपीतील मतदान पत्रिकेची पडताळणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 11 एप्रिल – अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान पत्रिकेची (बॅलेट पेपर) पडताळणी ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध प्रतिनिधींकडून नुकतीच करुन घेण्यात आली.  निवडणूक निरीक्षक (सामान्य) अनिमेष कुमार पराशर, निवडणुक निर्णय अधिकारी संजय दैने यावेळी उपस्थित होते. अंध प्रतिनिधी मारोती सोमाजी भारशंकर, श्रीमती कुंदा सखाराम पाल आणि  पुरुषोत्तम पांडूरंग किरंगे यांनी या ब्रेल लिपीतील मतदान पत्रिकेचे वाचन केले.

12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या अनुषंगाने अंध मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान पत्रिका ब्रेल लिपीमध्ये छपाई (तयार) करण्यात आली आहे. सदर मतदान पत्रिका ब्रेल लिपीमध्येच आहे किंवा नाही याबाबत ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध मतदार / अंध प्रतिनिधी यांचेकडून निवडणूक निरीक्षक पराशर यांचेसमक्ष पडताळणी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा निवडणूक अधिकारी आणि निवडणूक निरिक्षक यांनी ब्रेल लिपी पडताळणीबाबत समाधान व्यक्त करुन उपस्थित अंध प्रतिनिधींनी या निवडणूक कार्यात केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.