Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 11 एप्रिल – लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपुर्ण तपासणी नाक्यावर 24 तास नाकाबंदी सुरु ठेवावी व दारु, अवैद्य रकम, आणि अंमली पदार्थाची तपासणी करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी वन विभागाला दिल्या.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन होणेसाठी व निवडणूकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन व वन विभाग यांच्यात समन्वय राखणेबाबत काल जिल्हाधिकारी यांचे अध्यक्ष्यतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री दैने बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, उपवनसंरक्षक मितेश शर्मा (गडचिरोली), राहुल टोलीया (आलापल्ली), शैलेश मीना(भामरागड), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके यावेळी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे.आता या मोहिमेत वनविभागाच्या तपासणी नाक्यांचीही मदत होणार आहे.
तपासणीदरम्यान गैरप्रकार किंवा संशयीत प्रकार आढल्यास वनविभागाच्या तपासणी पथकाने नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक यांचेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त
जिल्ह्यात 1 मार्चपासून आतापर्यंत वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण दोन कोटी 20 लाख 50 हजार किमतीचे दारू व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.  यात 55 हजार 285  लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत 95 लाख 47 हजार रुपये आहे. तसेच एक कोटी 25 लाख  किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हे पण वाचा :-  

Comments are closed.