Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न?

काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 1 एप्रिल – महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भंडाऱ्यात पाठीमागून धडक दिल्याची घटना ताजी असतानाच आमदार आशिष जैस्वाल  यांच्या ताफ्याचाही भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाना पटोले मंगळवारी रात्री उशिरा भंडारा जिल्ह्यात त्यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने ते थोडक्यात बचावले होते, त्यानंतर काँग्रेसने पटोले यांच्या जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला होता. पटोले हे निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना कारधा गावाजवळ हा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नाही.

भंडारापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात भीषण हा अपघात झाला. पटोले मंगळवारी रात्री भंडारा येथे झालेल्या अपघातातून बचावले होते. कन्हानजवळ झालेल्या अपघातात जैस्वाल यांच्या ताफ्यातील पीएसह दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नाना पटोले यांनी ट्रकने जाणूनबुजून त्यांच्या कारला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तथापि, नंतर दुसऱ्या निवेदनात, त्यांनी सांगितले की काळजी करण्याचे कारण नाही. ट्रकने त्यांच्या कारची बाजू घासली होती.काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या दुर्घटनेवरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.