Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगलात पुरुन ठेवलेल्या २ रायफली जप्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली 21 फेब्रुवारी :- नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगल पुरुन ठेवलेल्या 2 रायफली जप्त केल्या.

आज  दिनांक 21-02-2023 रोजीचे सकाळी 10.00 वा. चे सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी हददीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दिल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या ०२ रायफली हस्तगत केल्या, हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत 201 सिंगल बॅरल 12 बोअर रायफल व 01एसएसआर रायफलचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वनजमिनीवर अवैध ताबा, विक्री प्रकरणात दोषारोप उघड होताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला केले निलंबित

Comments are closed.