Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जुगाऱ्यांनो सावधान.. गणेशोत्सवाच्या आड जुगार खेळाल, तर जेलची हवा खाल..!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

पालघर, 22 सप्टेंबर : पालघर जिल्ह्यासह राज्यात गणेश उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते, त्यामुळे ज्या उद्देशाने गणेश उत्सव सुरू झाला, त्या उत्सवाचे पावित्र्य धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र आता या जुगाऱ्यांवर पोलीस विभागाची करडी नजर असून, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रसिद्ध असलेल्या जुगार अड्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यात बोईसर, मनोर, सफाळे, वाणगाव, सातपाटी , केळवे, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, कुडूस, गणेशपुरी,तसेच वसई तालुक्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या काळात लपून छपून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो.
विशेष म्हणजे या जुगाऱ्यांमधे राजकिय क्षेत्रातील मंडळी, उद्योजक, ठेकेदार,यांच्यासह शिक्षकांचाही मोठा सहभाग असतो. जुगाराच्या नादात अनेक संसार उधावस्त होत असतात. तसेच जुगार खेळताना अनेक वेळा वाद देखील होत असल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सणासुदीच्या काळात अप्रिय घटना घडून, पवित्र सणाला कोणतेही गालबोट लागू नये, या पार्श्वभूमीवर अनेक पोलीस ठाण्यांकडून गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, पोलीस मित्र पोलीस पाटील, सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, राजकीय पदाधिकारी, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी, मुस्लिम समाज ट्रस्ट अध्यक्ष, पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांची पोलीस अधीक्षक पालघर यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. यामध्ये दोन्ही सण शांततेत व खेळीमेळीच्या वातावरण होणे बाबत चर्चा करून त्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक पोलीस अधिकारी आणि संबंधित नागरिकांनाही दिल्या होत्या.

त्यामुळे आता अशा अनुचित घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा सरसावली आहे. अशा जुगाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून मिळाल्याने सर्व पोलीस ठाण्यात याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांकडून देखील पोलिसांच्या या विशेष कारवाईचे स्वागत होत आहे.त्यामुळे जुगाऱ्यांनो आता सावधान राहा..! जर, गणेशोत्सवाच्या आड जुगार खेळाल, तर थेट जेलची हवा खायला तयार राहा..!

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.