Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कचरावेचक महिलांना मिळाली सामाजिक मान्यता

कैकाडी समाजाचा संघर्षमय प्रवास.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 6 नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील कैकाडी जमात ही तशी मागासवर्गीय. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये वास्तव्य करणाऱ्या या समाजाची मूळ भाषाही कैकाडी. कैकाडी म्हणजे मराठीत त्याचा अर्थ रानटी डुक्कर असा होतो. कैकाडी जमातीतील माणसे ही साधारणपणे मैला वाहणे, कचरा उचलणे तसेच सेप्टिक टँक साफ करणे ही कामे करतात. ८० % टक्के जमात ही कचरा उचलते आणि वराह पालन करते. समाजातील अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या या जमातीला युवा परिवर्तन सामाजिक संस्था आणि एचएसबीसी यांच्या प्रयत्नाने त्यांच्या जीवनात बरेच परिवर्तन आले आहे. शेती, आरोग्य चाचणी याचबरोबर त्यांना उपजिवीकेचे साधनही उपलब्ध करून दिलेले आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेल्या या मदतीमुळे कैकाडी समाजातील अनेक कुटुंबाना रोजगार मिळाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कचरा वेचक महिलांना मिळाला आधार –  कैकाडी जमातीतील महिला प्लास्टिक, कार्डबोर्ड असा कचरा गोळा करतात. त्यातून त्यांना तुटपुंजा पगार मिळतो. मात्र, युवा परिवर्तनच्या मदतीने त्यांना आता हक्काचे मानधन मिळाले आहे. युवा परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी या कचरावेचक महिलांकडून त्यांच्या विविध प्रकल्पासाठी लागणारे सामान विकत घेतले आहे. याचे त्यांना आता पुरेसे मानधनही मिळाले आहे. जसे त्यांना प्रत्येक प्लास्टिकच्या बाटलीमागे २ रुपये मिळत होते. युवा परिवर्तनच्या मार्गदर्शनानंतर याचसाठी त्यांना आता दुप्पट पैसे मिळतात. कचऱ्यातून मिळणाऱ्या विविध कपड्यापासून पायपुसणी, गोळ्या तसेच औषधे तसेच पाण्याची बाटली ठेवण्यासाठी पाऊच या बायका तयार करतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समाजाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला – बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे समाजाचा इतर अनुसूचित जातींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचे गडचिरोलीत काम करणारे युवा परिवर्तनचे स्वयंसेवक सांगतात. कल्पना वंदारी या दिवसातून ६ तास कचरा वेचण्याचे काम करतात. युवा परिवर्तनचे मार्गदर्शन मिळाल्यापासून त्यांच्या जीवनात चांगला बदल झाला आहे. पहिले कचरा विकून आधी वंदना दर वर्षाला १८३० रुपये कमवायच्या. युवा परिवर्तनच्या मार्गदर्शनानंतर त्या आता वर्षाला ४६०० रुपये कमावतात.

 

हे पण वाचा :-

Comments are closed.