राजे सत्यवानराव महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 17 जुलै – विदर्भवादी नेते, माजी आमदार, अहेरी इस्टेटचे राजे तथा धर्मराव शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष कैलासवासी राजे सत्यवान राव महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील प्रतिष्ठित नागरिक तथा धर्मराव शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राजघाट व राजवाड्यात त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.तसेच संस्थेशी संबंधित शाळेत, महाविद्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राजवाड्यात व राजघाटावर अभिवादन करणाऱ्यांमध्ये राज परिवारातील गणमान्य व्यक्ती, नगरपंचायतीचे आजी-माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विनोद भोसले, राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोरंजन मंडल, धर्मराव कृषी विद्यालयाचे प्राचार्य अनिल भोंगळे, प्राचार्य संजय कोडेलवार, मुख्या. धोटे,प्रकाश गुडेलीवार, प्र.मुख्याध्यापक गिरीश मद्देर्लावार, संतोष ऊरेते, प्राचार्य अनिल यावले, प्र . मुख्या. विशाल बंडावार, जयश्री खोंडे यांनी राजे सत्यवानराव महाराजांना राजघाटावर व राजवाड्यात अभिवादन केले.
सोबतच प्राचार्य टिपले, से.नि. विजय खोंडे , प्रा रमेश हलामी, प्रा. तानाजी मोरे , प्रा अतुल खोब्रागडे, प्रा शिरभैया, प्रा खंडाळे, एम आर सय्यद, सेनी. प्राचार्य सत्यनारायण गुप्ता, सेनी . काशिनाथ गोंडे, जनार्दन झाडे,से.नी.शि.कृष्णा मंचालवार , निब्रड, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे यांनीही यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
व्यंकटराव पेटा, नागेपल्ली, महागाव, आलापल्ली व अहेरी येथील धर्मराव शिक्षण मंडळ संलग्नित शाळांमधील प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संबंधित शाळेमध्ये कैलासवासी राजे सत्यवान महाराजांना कार्यक्रम घेऊन श्रद्धांजली वाहिली.
हे पण वाचा :-
Comments are closed.