राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 17 जुलै – राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापटनम या युद्धनौकेला तसेच आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली.
नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ऍडमिरल संजय भल्ला व आयएनएस विशाखापटनमचे कमान अधिकारी कॅप्टन अशोक राव यांनी राज्यपालांचे स्वागत केले व त्यांना युद्धनौकेची माहिती दिली.
आयएनएस वेलाचे कमोडोर श्रीराम अमूर व कमान अधिकारी मिथिलेश उपाध्याय यांनी राज्यपालांना आयएनएस वेला पाणबुडीची माहिती दिली.
हे पण वाचा :-
Comments are closed.