बीड जिल्ह्यातील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन केले सांत्वन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
बीड, दि. २८ नोव्हेंबर: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने दोन व्यक्तीवर हल्ला करून ठार केले होते. या गावाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट देऊन त्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी नरभक्षक बिबट्या न पकडला गेल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी वन्यजीव विभागाकडून घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सुरुडी आणि किन्ही येथे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली आणि त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सुरुडी येथील नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांचे पालकत्व स्वीकारून शासकीय मदत केली जाईल असे त्यांनी सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी अमरावती, नांदेड येथून पथक तैनात करण्यात आले आहेत. 15 टीम तैनात करण्यात आल्या असून पिंजरे लावण्यात आले आहेत.अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
Comments are closed.