Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खोब्रामेंढा-हेटाळकसा नक्षलविरोधी अभियानात यशस्वी कामगिरी करणाऱ्या जवानांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ७ एप्रिल: २९ मार्च २०२१ रोजी खोब्रामेढा-हेटाळकसा जंगल परिसरात अभियान राबवित असतांना दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर अंदाधुद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सी-६० जवानांनी समय सुचकता व बुध्दीकौशल्याचा वापर करुन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता गोळीबार केला. नक्षलवादयांनी कुटील डाव आखुन पोलीस पथकावर केलेला भ्याड हल्ला उधळुन लावला. सी-६० जवानांनी कोणत्याही अप्रिय घटनेशिवाय जहाल नक्षलवादी रुषी रावजी हिचामी ऊर्फ पवन ऊर्फ भाष्कर (डीकेएसझेडसीएम,डीव्हिसीएम ऑफ नार्थ गडचिरोली) व अन्य चार नक्षलवाद्यांस कंठस्नान घातले. याच कामगिरीची दखल घेऊन आज दि.०७/०४/२०२१ रोजी ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर अभियानात यशस्वी कामगिरी केलेल्या अधिकारी व कमांडर यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या वेळी जवानांना संबोधीत करतांना ना. एकनाथ शिंदे यांनी जवानांचे अभिनंदन केले. तसेच गडचिरोली पोलीस दलासाठी राज्य शासन सदैव आपल्या पाठिशी असुन, आपल्या पोलीस बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. त्याच बरोबर जवानांचे कौतुक करत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले व गडचिरोली जिल्हा हा एक दिवस नक्षलमुक्त होईल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

सदर नक्षलविरोधी अभियानाचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया, यांच्यासह १९ पोलीस अधिकारी व कमांडर यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास संदीप पाटील (भा.पो.से.) पोलीस उपमहानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, दिपक सिंगला (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी गडचिरोली, अंकीत गोयल (भा.पो.से.) साो. पोलीस अधीक्षक गडचिरोली, कुमार आशिर्वाद (भा.प्र.से.) मुख्य कार्यपालन अधिकारी गडचिरोली, समीर शेख सा. अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली व भाऊसाहेब ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी (अभियान) उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.