Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत पाऊसाचा कहर ; भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने १०० गावाचा तर मूलचेरा तालुक्यातील दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चूनारकर,

गडचिरोली जिल्हात तीन दिवसापासून सारखा पाऊस होत असल्याने संपुर्ण जिल्हा जलमय झाला असून सर्वत्र पूरपरस्थिती निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

1. अहेरी ते मुलचेरा मार्ग (गोमनी नाला)
2. खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग
3. एटापल्ली नाक्यासमोरील मार्ग,
4. बोलेपल्ली मार्ग (गेदा जवळ)
5. पाविमुरंडा च्या जवळील नाल्यावरील मार्ग
6. चामोर्शी ते मक्केपली मार्ग (मछली नाला)
7. पोटेगाव च्या समोरील मार्ग
8. आलापल्ली ते भामरागड राष्ट्रिय महामार्ग (पर्लकोटा नदी)
भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसांडून वाहत असल्याने तालुक्यातील जवळपास शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली,१८ :  जिल्ह्यात तीन दिवसापासून सततधार पाऊस होत असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत . यातच भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने भामरागड तालुक्यातील शंभर पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे.तर दुसरीकडे मुलचेरा तालुक्यातील दिना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्टीकडे जाणारा राज्यमार्ग पूर्णता बंद आहे

दक्षिण गडचिरोलीतील आलापल्ली हे गाव मध्यभागी शहर असून याच ठिकाणाहून जिल्हाभरात महामार्ग राज्यमार्ग जातात. यातच आलापल्ली – मुळचेरा राज्य मार्गावर दिनानदी,गोमनी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने आष्ठी, गावाचा संपर्क तुटला आहे, तर आलापल्ली-भामरागड
महामार्गावर छोट्या मोठ्या पुलांचे नवनिर्माण बांधकाम सुरू आहे आणि या ठिकाणी सततधार पाऊसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पूर्णपणे मार्ग बंद पडला आहे .

जिल्ह्यात सततधार पाऊस होत असल्यामुळे प्रशासनाने नदी ,नाल्या काठावरील गावांना सतर्कतेचा  इशारा दिला आहे.कारण पूर परिस्थितीने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.जिल्हाभरात सध्या पाण्याचा जोर कायम आहे.त्यामुळे काही शाळांना सुट्टी ही देण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही अनुश्चीत प्रकार घडू नये. यासाठी प्रशासन दक्ष आहे .या शिवाय कुठल्याही परिस्थितीत अडचण निर्माण झाल्यास अथवा अनुश्चीत प्रकार निदर्शनास  आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना तात्काळ माहिती देण्यात येण्याचे आवाहन  प्रशासनाकडून करण्यात आले आहे..

Comments are closed.