गडचिरोली जिल्हयातील हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे १ मे रोजी उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क
गडचिरोली, ३० अप्रैल :- शाासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना / नागरी आरोग्यवर्धीनी केंदाचे गडचिरोली येथे दिनांक ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली जिल्हयातील पाच तालुके गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी, वडसा व चामोर्शी हया तालुक्यामध्ये आपला दवाखाना चे उद्घाटन होणार आहे. गडचिरोली जिल्हयाकरीता एकुण १५ नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र मंजुर करण्यात आलेले आहे. आपला दवाखाना आधुनिक तंज्ञानाने स्मार्ट बनविणे सात्यतपुर्ण व गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देणे, विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि निरिक्षण व नियंत्रण करणे, सुलभ व परवडणी दर्जेदार आरोग्य सेवा देणे, शहरी भागातील गरीब रुग्णांसाठी मोफत सुविधा असे विविध प्रकारचे उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे.
शहरी भागातील जनसामान्य गोर गरीब झोपडपट्टी भागात राहणा-या नागरीकांसाठी गडचिरोली आरोग्य विभागामार्फत हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत स्थापित केले जाणार आहे.
आपला दवाखानाअंतर्गत हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये खालीलप्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. बाहयरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी टेलि कन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी लसिकरण, महीण्यातील निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, बाहययंत्रणेव्दारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, याकरीता वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारीका, बहुदेशिय आरोग्य कर्मचारी, अटेंन्डंट / गार्ड व सफाई कर्मचारी याप्रकारे मणुष्यबळ कार्यरत राहील.
हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रातुन रुग्णांना गरजेनुसार जिल्हयातील ठराविक नागरी आरोग्य केंद्रामध्ये पॉलिक्लिनीक सुरु केलया जाईल. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची सेवेचा लाभ जनतेस दिला जाईल. सर्वांनी या दवाखाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी केले आहे.
Comments are closed.