Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली ब्रेकिंग: पोलीस नक्षल चकमकीत तीन नक्षल ठार..

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली, ३० एप्रिल :- पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नक्षल असल्याची माहिती होताच साय 7:00 वाजताच्या सुमारास C-60 पोलीस जवान नक्षल विरोधी अभियान राबविताना जंगलात आधीच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलीस जवानावर अंधाधुंद गोळीबार केला त्यात पोलिसांनी ही प्रतिउत्तर देत नक्षल्यांच्या दिशेने जशास तसे उत्तर दिले असता त्यात तीन नक्षल्याना खात्मा करण्यात पोलीस जवानांना मोठें यश आले आहे.

चकमकीत खात्मा झालेल्या नक्षल्यात एक पेरमिली दलम कमांडर बिटलु, सदस्य वासु,तसेच अहेरी दलम सदस्य श्रीकांत चां समावेश असून घटनास्थळी नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले असून घटनास्थळी सर्चीग ऑपरेशन सुरू असून पाऊस येत असल्याने तसेच घनदाट जंगल असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भामरागड तालुक्यातील ताडगावं पोलीस मदत केन्द्र अंतर्गत येत असलेल्या केडमारा जंगल परिसरातील घटना.

हे पण वाचा 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.