Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालघरच्या रुद्राक्षने रचला। इतिहास

पालघरच्या शिरपेचात मानाचा तुरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर 15 ऑक्टोबर :- पालघर सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यातून एखादा खेळाडू दैदिप्यमान कामगिरी बजावतो तेव्हा लोकांच्या मनात एक।आनंदाची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. अशीच पालघर जिल्ह्यातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांचा मुलगा रुद्राक्षने पाटीलने चमकदार कामगिरी केलीय. दहा मीटर रायफल स्पर्धेत रुद्राक्षने विश्वविक्रम केला आहे. टोकीयो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत विजय पटकावलेल्या तिनही स्पर्धकांवर मात करत रूद्राक्षने सुवर्ण पदक पटकावलं आहे. त्यामुळे 2024 मध्ये फ्रान्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील रुद्राक्षचा प्रवेश निश्चित झाला आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत रुद्राक्षने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रुद्राक्षने राष्ट्रीय स्पर्धेत 20 सुवर्ण, 12 रौप्य, 7 रजत पदक मिळवत खेलो इंडिया युथ स्पर्धा 2020 मध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रुद्राक्षने 8 सुवर्ण, 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रुद्राक्ष सध्या सिनिअर वर्ल्ड रँकिंग मध्ये सातव्या क्रमांकावर असून ज्युनिअर वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. रुद्राक्षची कामगिरी पाहता आगामी ऑलम्पिक स्पर्धेत रुद्राक्ष देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात कमी पडणार नाही, असा विश्वास रुद्राक्षच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.