Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंदिया पोलिसांचे अदानी प्रकल्पासमोर मॉक ड्रिल

मात्र बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने नागरिक भयभीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया 15 ऑक्टोबर :-  एखादी दुर्घटना, नक्षल कारवाई, दहशतवादी हल्ला किंवा आपत्ती ओढवल्यास अशा प्रसंगी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचे प्रात्यक्षिक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते, अभिजीत जोगदंड, गंगाझरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तोंडले, दवनीवाडा पोलीस स्टेशनचे पीएसआय राऊत, बॉम्बशोधक व नाशक पथक शीघ्र कृती दल, डॉग स्कॉड व नक्षलसेल असे ५० पोलीस कर्मचारी व अदानी प्रकल्पाचे ४० सुरक्षा रक्षक यासर्वांनी प्रात्यक्षिक करून दाखविले.

या प्रात्यक्षिकात एखाद्या ठिकाणी बॉम्ब असल्यास यावेळी या स्थळापासूनागरिकांना लांब ठेवणे , घटना स्थळाजवळील कर्मचारी व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून बॉम्ब शोधून निकामी करण्याचे प्रात्यक्षिक नियोजित वेळेत पार पाडले .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र यावेळी अदानी प्रकल्पा जवळ बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने आसपासचे गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.