Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाढता कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करणार – एम. देवेंद्र सिंग जिल्हाधिकारी यवतमाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ, दि. १८ फेब्रुवारी: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संखेच्या पारश्चभूमीवर संचारबंदी लागू करणार असल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी दिली आहे. पुसद पांढरकवडा व यवतमाळ भागात कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता उपाय योजना म्हणून कडक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तीन तालुक्यात कडक निर्बंध लावत संचारबंदी लागू करणार आहे. यात 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न, 5 लोकांच्या वर लोकांना उभं राहता येणार नाही, यात्रा महोत्सव सभा रद्द, शाळा महाविद्यालय क्लासेस सुद्धा बंद असणार आहेत तसेच सकाळी 9 ते रात्री 10 यावेळेत दुकाने उघडी राहतील

Comments are closed.