Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समृद्धी महामार्गाचे नव्या वर्षात लोकार्पण ? २९ किमीच्या कामासाठी लागणार २ महिने..

काटेपूर्णा पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत. ४९१ किमीचे काम पूर्णतः तयार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नागपूर, 12 नोव्हेंबर :- बहुप्रतीक्षेत असलेल्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किमीच्या समृद्धी महामार्गापैकी ४९१ किमीचे काम सध्या पूर्ण झाले आहे,तर उर्वरित २९ किमीचे काम पूर्ण करण्यासाठी किमान दोन महिने लागणार असल्याची माहिती आहे,बुलडाणा जिल्ह्यातील काटेपुर्ना पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने विलंब लागत आहे,त्यामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण आता नव्या वर्षातच होणार आहे. नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे काम झाल्यानंतर २०२३ मध्ये उर्वरित महामार्ग पूर्ण करून एकूण ७०१ किमीचा महामार्ग खुला होईल. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी महामार्ग सुरू करण्यासाठी वेगाने काम केल्या जात आहे. शिर्डी ते इगतपुरी आणि इगतपुरी ते मुंबई असा एकूण ७०१ किमी काम केल्या जात आहे

पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाच्या ५२० किलोमीटर पैकी ४९१ किलोमीटरचा सिमेंट रस्ता तयार झाला आहे. नागपूर ते सेलू बाजार दरम्यान २१० किलोमीटर आणि मालेगाव ते शिर्डी दरम्यान २८१ किलोमीटरचा रस्ता तयार झाला आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर केवळ पुलाचे काम सध्या अपूर्ण अवस्थेत आहे.देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अलिबाग तहसीलदार मिनल दळवी लाच लुचपतच्या जाळयात

Comments are closed.