Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2021 मध्ये नोकरीच्या संधी; या करियरच्या पर्यायांना आहे मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क:-  देशातच नाही तर संपूर्ण जगाची कंबर कोरोना साथीने मोडली आहे. या साथीच्या आजारामुळे जगभरातील कोट्यावधी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावले आहेत. त्याच वेळी दुसरीकडे अनेक लोकांचे पगार कापण्यास सुरुवात झाली आहे. एका मिळालेल्या अहवालानुसार covid-19 पुढे जगभरातील सुमारे 30.5 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मोठ्या कंपन्यांची स्थिती बिकट झाली आहे. तथापि अशा कठीण परिस्थितीतही अशी काही क्षेत्र आहेत . त्यात नोकरीची खूप मागणी आहे. ही क्षेत्र आहेत- औषधी निर्मिती क्षेत्र, डिजिटल मार्केटिंग , आयटी क्षेत्र, डिजिटल मार्केटिंग, आयटी क्षेत्र,  हेल्प डेस्क-ग्राफिक डिझायनर सॉफ्टवेअर, डेव्हलपमेंट, डेटा ऑनालिस्ट क्षेत्र आहेत.

औषधनिर्मिती क्षेत्र

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना काळात या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. मार्चमध्ये साथीच्या रोगांमुळे देशभरामध्ये लॉकडाउन लावल्यामुळे देशात ऑनलाइन औषध खरेदीचा कल लक्षणीय वाढला. लोकांनी त्यांच्या नियमित औषधांसोबत आरोग्य पूरक आहार, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधे यांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केली यामुळे फार्मसी आणि ई-फार्मसी कंपन्यांमध्ये नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. फार्मासिस्ट आणि डिलिव्हरी बाय सारख्या नोकऱ्या अनेक पटीने वाढल्या.  भविष्यात देखील या संधी अशाच राहतील अशी अपेक्षा आहे. विशेष करुण  भारत हा जगातील जेनरिक औषधांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे.

डिजिटल मार्केटिंग

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आजचे युग हे डिजिटल युग आहे. साथीच्या रोगांमुळे प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवर अवलंबून आहे. म्हणूनच हे क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. ते म्हणजे डिजिटल मार्केटिंग सोप्या शब्दात सांगायचे झाले तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट. संगणक आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाद्वारे मार्केटिंग करणे यामध्ये डिजिटल मार्केटिंग मॅनेजर मार्केटिंग मॅनेजर, सोशल मीडिया मार्केटिंग स्पेशलिस्ट, कंटेंट रायटर, सर्च इंजिन मार्केटर,  इनबॉक्स मार्केटिंग मॅनेजर आदी नोकऱ्यांचा समावेश येतो.

आयटी क्षेत्र

2021 मध्ये आयटी क्षेत्र नेहमीप्रमाणे तेजित असणार आहे. Covid-19 साथीच्या काळातही या क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी आहेत. यावेळी डिजिटल कौशल्याची मागणी वेगाने वाढत आहे. म्हणून या क्षेत्रात नोकरीच्या उत्तम संधी निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत  विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे.  त्यांनी कोडींग, रोबोटिक्स मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता शिकण्याची आवश्यकता आहे.

डेटा अॅनालिटिक्स जागतिक महामारी दरम्यान नोकरीच्या सर्वात उत्तम संधी निर्माण करणारे आणखी एक क्षेत्र म्हणजे डेटा अॅनालिटिक्स साथीच्या आजारानंतर डेटा वापर आधीच्या तुलनेत अनेक पटीने वाढला आहे. जितका डेटा तयार होत आहे. त्यानुसार त्याचा वापरही केला जात आहे. अशा परिस्थितीत डेटा सायटिस्ट आणि उत्तम सांख्यिकीय ज्ञान असणाऱ्या जानकार तरुणांची मागणी वाढणार आहे.

Comments are closed.