Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉयड मेटल अँड एनर्जीं लिमिटेड कंपनी तर्फे हेडरी येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न..

सुरजागड खदान परिसरातील दोन हजार पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गड़चिरोली 6 सप्टेंबर 2022 :-  गडचिरोली जिल्ह्यातील अती दुर्गम अशा एटापल्ली तालुक्यातील हेडरी गावात लॉयड मेटल अँड एनर्जीं लिमिटेड कंपनी तर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुरजागड लोहखदान परिसरातील तब्बल 40 ते 50 गावातील 2 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरासाठी बालरोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, सर्जन, मेडिसिन, ई.एन.टी, आदी विभागांतील 11 तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. एटापल्ली येथील उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता(IAS) यांच्या शुभ हस्ते महाआरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अतिशय दुर्गम असून हेडरी गावआणि सुरजागड लोह खदान परिसरातील इतर गावांमध्ये रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधा नाहीत त्यामुळे येथील नागरिकांना उपचारासाठी मोठे अंतर कापून चालतच तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं हीच अडचण लक्षात घेऊन लॉयड मेटल अँड एनर्जीं लिमिटेड कंपनी तर्फे सुरजागड खदान परिसरातील दुर्गम गावातील नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या आरोग्य शिबिरात येण्यासाठी नागरिकांना वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली होती शिवाय तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून सर्व रुग्णांची तपासणी तसेच उपचार करण्यात आले. तसेच शिबिरातील येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची तसेच पाणी व इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्यामुळे नागरिकांना देखील या आरोग्य शिबराबाबत समाधान व्यक्त केलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोग्य शिबिरात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या टीम मध्ये हैद्राबाद आणि चंद्रपूर येथील प्रसिध्द रुग्णालयातील डॉक्टर होते. तर काही स्थानिक एसडीएच, आरएच, येथील डॉक्टर होते ह्या भव्य आरोग्य शिबीराचे उदघाटन एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी मा. शुभम गुप्ता यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी तळस साहेब, अहेरीचे तहसीलदार ओमकार ओतारी, हेडरी येथील पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी सुकाडे, पोलिस उपनिरीक्षक, अरुणा सडमेक सरपंच, राकेश कवडो उपसरपंच व सदस्य उपस्थित होते तर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी साईकुमार , शेट्टी, जीवन हेडाव, व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन या आरोग्य शिबिराचे यशस्वी नियोजन केले.

हे देखील वाचा :- 

Comments are closed.