Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रेतीघाट लिलावाकडे स्थानीक आमदारांचे दुर्लक्ष; भाजपचे तालूका उपाध्यक्ष संजय अलोणे यांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : पावसाचे दिवस सुरू होण्यास जेमतेम एक महिना बाकी असुन यावर्षी रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नसल्याने स्थानिक आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी शासनदरबारी काही पाठपुरावा न केल्याने स्थानिक नागरीकांना घर बांधकाम, शौचालय बांधकाम आदी कामासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  ही बाब मोठी शोकांतिकेची असून आमदारांचे दुर्लक्ष होत असल्यानें आमचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. अशी प्रतिक्रिया भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय अलोने यांनी आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

दरवर्षी रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, पण गेल्या दोन वर्षांपासून अहेरी येथील रेटिघाट लिलाव प्रक्रिया झाली नाही. विशेष म्हणजे अहेरीत कोट्यवधी रुपयांची रेती असणारे घाट आहेत, परंतु घाट लिलाव प्रक्रिया अजूनही झाली नसल्याने स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम असून देखील नसल्याप्रमाणे आहेत,  कारण स्थानिक नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी जनतेनी निवडून दिले आहेत, मात्र निवडुन येताच आमदारसाहेबांनी हातवर केल्याने नागरिकांना ननाहक त्रास सोसावा लागत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रेतीघाटांवर होणारा रेती उपसा, रेतीघाटांचे लिलाव त्यासाठी निर्धारीत करण्यात आलेले पर्यावरण पुरक प्रमाण, त्यासाठी लागणारी शासन मंजुरी, पर्यावरण मंडळाची मंजुरी आणि या सगळ्यांनतरही होणारा अवैध रेती उपसा हे सदैव वादाचेच विषय आहेत.

तालुक्यातील जनतेला नाईलाजास्तव चोरीच्या पद्धतीने रेती आणून कसे बसे घराचे काम करत आहे, सद्या स्थितीत ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फ़त अनेकांना घरकुल शौचालय योजना येऊन रेती अभावी काम रेखाळले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर घाटातून रेतीचा उपसा करणें शक्य नाही, त्यामुळे उपलब्ध दिवसात जेवढी रेती काढणे शक्य आहे, त्या आधारावर घाटांचे लिलाव प्रक्रियेत आमदार आत्राम यांनी विशेष लक्ष देऊन घाट लिलाव होईपर्यंत लक्ष देणे गरजेचे आहे मात्र याचे विपरीत परिणाम दिसून येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

धक्कादायक!! प्रेयसीने लग्नासाठी लावला तगादा अन् प्रियकराने उचलले टोकाचे पाऊल!

मुलाच्या क्रिकेट प्रेमासाठी ५ एकरची द्राक्ष बाग काढून वडिलाने बनवले राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान

 

Comments are closed.