Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

MPSC ची पूर्व परीक्षेची सुधारित तारीख जाहीर

कोरोनामुळे या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आला होत्या. मात्र आता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क 11 जानेवारी:– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अखेर विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं आहे. एमपीएससीने याबाबत प्रसिद्धपत्रक जारी करुन नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2020 मध्ये आयोजित परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 7 सप्टेंबर 2020 च्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा प्रस्तावित होती. पण सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. यासोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षाही पुढे ढकलल्याचं प्रसिद्धीपत्रक 13 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलं होतं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 27 मार्चला घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांकडे दोन महिन्यांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या दोन महिन्यांत विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षांच्या तारखांची अद्यापही घोषणा करण्यात आली नाही मात्र साधारण ऑगस्ट महिन्यात मुख्य परीक्षा घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.