Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मातोश्रीवर ७ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाचा मशाल मोर्चा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई ३०-ऑक्टो :- राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक झालेले मराठा आंदोलक आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर धडकणार आहेत. ७ नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चाकडून मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय मराठा आमदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मातोश्रीवर मशाल मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 7 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीच्या दिशेने मशाल मोर्चा निघेल. याशिवाय, अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण उपसमितीही बरखास्त करण्यात यावी, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या ?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१- मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.

२- मराठा अरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.

३- मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन संरक्षित केले जावेत.

Comments are closed.