Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युरोपात काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन, कोरोनाची दुसरी लाट.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जगभरात सगळीक़डे अनलॉक करण्यात आले. पण आता आधी वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने बुधवारी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँक्रोन यांनी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

हा नवीन लॉकडाऊन महिन्याभराच्या काळासाठी आहे. फ्रान्समध्ये एकाच दिवसात कोरोनामुळे 520 जणांचा बळी गेल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या काळात फ्रान्समधील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व हॉटेल्स, बार आणि उद्योगधंदे शुक्रवारपासन बंद राहतील. दरम्यान जर्मनी, स्पेन या देशांमध्येही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने तिथेही लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. चीनमध्येही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचे समजतंय. स्पेन, ब्रिटन इटली, जर्मनी या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात वाढत असल्याचे समोर आले आहेय भारतात आता अनलॉक अंतर्गत काही मोजक्या गोष्टी सोडल्यास इतर सर्व उपक्रम सुरू झाले आहेत. रुग्णांची संख्या कमी होते आहे. पण त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारतर्फे वारंवार केले जाते आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारतात आता अनलॉक अंतर्गत काही मोजक्या गोष्टी सोडल्यास इतर सर्व उपक्रम सुरू झाले आहेत. रुग्णांची संख्या कमी होते आहे. पण त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारतर्फे वारंवार केले जाते आहे

Comments are closed.