Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरोग्य विभागा मार्फत मान्सून काळात साथरोगापासून बचावाकरीता उपाययोजना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि.19:- मान्सुन पुर्व तयारी:-जिल्हातील संपर्कतुटणाऱ्या 454 गावापैकी 11 तालुक्यातील 19 प्रा.आ.केंद्रा अंतर्गत 92 उपकेंद्रा मध्ये नवसंजीवनी अंतर्गत येणाऱ्या 303 अतिदुर्गम गावामध्ये साधारणपणे 190 आरोग्य पथके व 54 भरारी पथकांमार्फतीने मान्सून पुर्व आरोग्य तपासणी पुर्ण करण्यात आलेली आहे.या अंतर्गत गरोदर माता,स्तनदा माता,0 ते 5 वर्षाची बालके हिवताप व असंसर्गजन्य आजारा बाबत प्रामुख्याने नागरिकांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान एकूण 1071 पैकी 974 गरोदर माता,12132 पैकी 936 स्तनदा माता,121 सॅम् व 386 मॅम बालकांची तपासणी रुग्ण् उपचार करण्यात आले आहेत.हिवताप बाबत ”अ ” संवर्गाची 231 गावे व ” ब ” संवर्गाची 484 गावे आहेत. या गावामध्ये हिवताप विषयक तपासणी मोहिम पुर्ण झालेली आहे.

जिल्हातील पिण्याच्या पाण्याचे 14294 स्त्रोताचे सर्वेक्षण माहे मे अखेर पुर्ण झाले असून त्यानुसार 35 ग्रामपंचायतीना लाल कार्ड 279 ग्रामपंचायातींना पिवळे कार्ड वितरीत करण्यात आलेले आहे. या सर्व गावा मध्ये पुरेसा औषधी साठा आरोग्य संस्था व आशा कार्यकर्तीयांकडे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्हयात साथरोग उदभवल्यास जिल्हा साथरोग संशोधन पथक (शिघ्र् प्रतिसादपथक ) स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्हा स्तरावर आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 07132-222317 आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व भरारी पथकांना रुग्णवाहीका उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
मान्सुन दरम्यान घ्यावयाची काळजी:- गडचिरोली जिल्हातील जनतेस आवाहन करण्यात येते की, आपल्या जिल्हयामध्ये हिवतापाचा धोका सर्वात जास्त असुन त्यापासून बचावाकरीता मच्छरदाणिचा वापर करावा. त्याचप्रमाणे ओडोमॉस सारखे क्रिम सुध्दा वापरण्यास हरकत नाही. पावसाळयाच्या दिवसात अतिसार टाळण्याकरीता पिण्या करीता स्वच्छ पाण्याचा वापर करावा.पाणी उकळून व गाळून प्यावे ,तसेच मेडीक्लोर चा वापर करावा. शेतात काम करीत असतांना विंचु दंश,सर्पदशाकरीता आवश्यक एएसव्ही हे औषध उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपर्क तुटणाऱ्या गावातील माहे जुलै 2022 मध्ये प्रसुती होणाऱ्या मातांना सुरक्षीत स्थळी स्थलांरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात मुख्यता भामरागड,एटापल्ली,अहेरी,सिरोंचा,या तालुक्यातील सर्व मातांना जवळच्या माहेर घरात किंवा त्या मातांना ज्या ठिकाणी सोयीस्कर होईल त्या ठिकाणी मातांना स्थलांरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे.
मान्सुन काळात आरोग्य कर्मचारी यांनी आशाचा सहभाग घेवुन दैनंदिन सर्व्हेक्षणाच्या माध्यमातुन प्रत्यक्ष घरोघरी भेट देवुन जुलाब,उलटी,ताप व इतर आजाराच्या रुग्णाचे सर्व्हेक्षण करण्यात येवुन आढळलेल्या रुग्णावर प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपचार करण्यात येईल व गंभीर रुग्ण् आढळल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्याने संदर्भ सेवा दिली जाणार आहे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी केले आहे.

Comments are closed.