Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घाटकोपर मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात साफसफाई करून मनसेने केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुबंई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र.129 चे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी आज पारशिवाडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात मागील 10 दिवसांपासून पडलेले झाड मनपा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी ला सांगून पण काढत नव्हते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पडलेले झाड साफ करून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या फलकाला पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली मनपा प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.

पारशिवाडी येथील जय महाराष्ट्र गणेश मैदान शाळेसमोरील दोन झाडे तौक्ते वादळात कोसळली यामध्ये शाळेसमोरील असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर नामकरण बोर्डचे नुकसान झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या 10 दिवसांपासून मनसेकडून प्रशासनास सावरकर यांच्या जयंतीची आठवण करून देत झाड उचलण्यासाठी विनवनी करण्यात आली मात्र एन वार्ड पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसे शाख्याध्यक्ष अरविंद गीते यांनी केला आहे.

 

Comments are closed.