Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या पाठपुराव्याने राज्यांत जिल्हावार खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्यात यश

महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ३६ खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय. केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य होणार प्राप्त .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई  डेस्क, दि. २८ मे : क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीयक्रीडा मंत्री महोदयांची भेट घेवून राज्यात जिल्हावार खेलो इंडिया सेंटर (केआयसी) सुरु करण्याची मागणी केली होती.त्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकतेच सुनील केदार यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीड़ा मंत्री श्री किरेन रिजिजू यांचेशी भेटून महाराष्ट्रातील क्रीड़ा धोरण व आंतरराष्ट्रीय क्रीड़ा विद्यापीठा बाबत चर्चा केली होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुनील केदार म्हणाले, देशभरात तळागाळातील क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत, त्यानुसार देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक खेलो इंडिया सेंटर मान्य करण्यात येणार आहे, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1000 नवीन खेलो इंडिया सेंटर उघडण्याच्या क्रीडा मंत्रालयाच्या या मोठ्या योजनेत महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी सर्वच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ३६ खेलो इंडिया सेंटर स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडून रु.३.६० कोटी इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने एकमेकांच्या सहकार्याने, राज्यातील व देशातील तळागाळातील खेळाडूंना उत्तमोत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा खेलो इंडिया सेंटर उभारणीचा उद्देश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्याद्वारेच लहान वयातील प्रतिभावान खेळाडूंना या योजनेतून चांगले प्रशिक्षक आणि उपकरणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे, मला खात्री आहे की, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करण्यासाठी ही केंद्रे सहाय्यभूत ठरणार आहेत.

राज्यात जास्तीत खेलो इंडिया अंतर्गत अधिक सेंटर्स सुरु करुन खेळाडूंना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याचे त्यानी यावेळी सांगितले.

Comments are closed.