Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आशिष देशमुख उद्या नितीन गडकरींच्या उपस्थितीत माझा भाजप पुनर्प्रवेश

ओबीसींच्या कल्याणासाठी, विदर्भाच्या हितासाठी काम करणार'

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 17 जून – आमदार नितीन देशमुख यांची उद्या, रविवारी भाजपवापसी होणार आहे. कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये देशमुख हे भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. त्यांच्या पुन्हा एकदा भाजप प्रवेशामुळे नागपुरात भाजपचा गड आणखी मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. आशिष देशमुख 6 वर्षानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

नितीन गडकरी यांच्या भेटीबाबत आशिष देशमुख म्हणाले की, “मी भाजपमध्ये घर वापसी करत आहे. नितीन गडकरी यांनी मला अनेक वेळेला संधी दिली आहे, गडकरी साहेबांशी माझा ऋणानुबंध आहे. त्याच नात्याने आज त्यांची भेट घेतली, आशीर्वाद घेतले.” तसंच पक्षाची इच्छा असेल की मी संघटनात्मक काम करावे तर मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. ओबीसींच्या कल्याणासाठी आणि विदर्भाच्या हितासाठी आशिष देशमुख भाजपमध्ये काम करेल, असं ते म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आशिष देशमुख यांना फार मोठा राजकीय वारसा लाभलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष, मंत्री रणजित देशमुख यांचे ते पुत्र आहेत. पण जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमधील सुनील केदार गटाशी न पटल्याने आशिष देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश करत खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर ते सावनेर मतदारसंघातून सुनील केदार यांच्या विरोधात निवडणूक लढले. परंतु त्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2014 च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने सावनेरऐवजी काटोल मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी त्यांचे काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव करत विजय मिळविला.

मात्र काही वर्षांमध्येच त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे विदर्भ विकासाच्या मुद्द्यावरून मतभेद झाले.  नंतर त्यांनी त्यावेळी सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारवर टीका केल्याने ते भाजपामध्ये एकाकी पडले. पण नंतर देशमुखांनी ऑक्टोबर 2018 मध्ये काटोल विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत वर्धा येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.