Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नामविस्तार दिन उत्साहात साजरा

१७ वर्षाच्या लढ्यानंतर विद्यापीठाला मिळाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

औरंगाबाद, दि. १४ जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाला डॉ बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी उभारलेल्या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या अनुयायांना तब्बल १७ वर्षे लढा उभारावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना १४ जानेवारी १९९४ ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

१९७७ ते १९९४ या काळात नामांतराचा लढा उभारला आणि १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. अखेर एका वेगळ्या लढ्याचा विजय झाला. त्याच दिवसाची आठवण म्हणून आजचा नामविस्ताराचा दिवस साजरा केला जातो.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महावितरणच्या धडक कारवाईत राज्यात एका महिन्यात ११ कोटी रुपयांची वीजचोरी उघड

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याकरीता मुदतवाढ मिळाल्याबाबत

 

 

Comments are closed.