Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नेपाळमध्ये विमान कोसळलं, आता पर्यंत 45 मृतदेह सापडले

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, बचावकार्य सुरु.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

काठमांडू 15, जानेवारी :- रविवारी नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. या घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. सध्या विमानतळ बंद आहे. यति एअरलाइन्सचं ATR-72 विमान पोखराजवळ अपघातग्रस्त झाल्याने विमानात प्रवास करणाऱ्या अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. आतापर्यंत 45 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं समोर येत आहे.

दुमिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि नदीत कोसळले. यानंतर विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. पोखराजवळ कोसळलेले प्रवासी विमान यती एअरलाईन्सचे असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. दरम्यान अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महत्त्वाची बाब म्हणजे या विमानात 5 भारतीय प्रवासीही होते. अपघातानंतर नेपाळच्या पंतप्रधानांनी गृह मंत्रालय, सुरक्षा कर्मचारी आणि सर्व सरकारी यंत्रणांना तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघाताचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान दहल काठमांडू विमानतळावर रवाना झाले आहेत. पोखरा विमानतळावर प्रवासी विमान अपघातानंतर नेपाळ सरकारने मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.