Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी 16 जानेवारी :- भुमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची नक्षलवाद्यांची कुटील योजना हाणून पाडण्यास गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा वेडमपल्ली जंगल परिसरात १५ जानेवारी २०२३ रोजी विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दुपारी २.०० वा. दरम्यान सदर जंगल परिसरात २० ते २५ अशा मोठ्या संख्येतील नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. विशेष अभियान पथकांच्या बहादूर जवानांनी प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता, जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षल चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, त्यामध्ये ०१ नग भरमार, ०१ नग पिस्टल, ०१ नग वॉकीटॉकी चार्जर व इतर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त केले.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांचे देखरेखीखाली पार पडली.

विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कौतूक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.