‘काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेत आहात, लक्षात ठेवा’, नाना पटोलेंनी शिवसेनेला ठणकावलं
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत: नाना पटोले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबईडेस्क, दि. ३१ मार्च: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता शिवसेनेला थेट शब्दात इशारा दिला आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर आहे. हे लक्षाता ठेवावं.’ अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेनेला ठणकावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे संजय राऊतांवर सातत्याने टीका करत आहेत. त्यात आता नाना पटोलेंनी थेट अशाप्रकराचं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार‘
‘शिवसेना पक्ष हा UPA चा घटकपक्ष नाही, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाबद्दल संजय राऊतांनी वक्तव्ये करू नयेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे’ असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपण्याची शक्यता आहे.
‘राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते हे स्पष्ट झालं’
काल (३० मार्च) पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांचं थेट नाव घेऊन नाना पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘पवार-शाह भेटीविषयीच्या संजय राऊत यांच्या ट्विटमुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत हे स्पष्ट झाले आहे.’ असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. याचवेळी नाना पटोलेंनी काँग्रेसमुळे महाविकास आघाडी सरकार आहे असं म्हटलं आहे.
Comments are closed.