धक्कादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज ७३ नवीन कोरोना बाधितांची नोंद तर २२ कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३१ मार्च: जिल्हयात आज ७३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज २२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित १०६२८ पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या १००५५ वर पोहचली. तसेच सद्या ४६२ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण १११ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६१ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ४.३५ टक्के तर मृत्यू दर १.०४ टक्के झाला.
नवीन ७३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील १९, अहेरी १३, आरमोरी ७, भामरागड तालुक्यातील ११, चामोर्शी ३, धानोरा तालुक्यातील २, एटापल्ली १, कोरची १, कुरखेडा १, तर वडसा तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या २२ रूग्णांमध्ये गडचिरोली मधील १८, भामरागड १, चामोर्शी २ , धानोरा १, जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये पोस्ट ऑफीस जवळ १, कोटगल १, स्थानिक ५, मेडिकल कॉलनी ३, पीडब्लूडी कॉलनी १, पारडी १, साईनगर १, लक्ष्मीनगर १, एसीबी ऑफीस १, पोलीस कॉलनी १, गोकुलनगर १, सोनापुर कॉम्पलेक्स १, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली ७, स्थानिक ३, नागेपल्ली ३, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये अरसोडा १, इंदिरानगर बर्डी १, स्थानिक ४, कृषी उत्पन्न बाजार समिती १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये देऊळगाव १, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये आलेवाडा १, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, जोगना १, विकासपल्ली १, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ कॅम्प २, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १०, येरवाडा १, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये मारडाकुही १, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये विसोरा १, वीरसी २, सीआरपीएफ कॅम्प ४, भगतसिंग वार्ड १, कोकडी १, गांधी वार्ड २, एमजी विद्यालय ३, आंबेडकर वार्ड १, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये १ जणांचा समावेश आहे.
Comments are closed.