Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयाचा एनएक्यूयूआयएम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 12,ऑक्टोबर :-  गडचिरोली जिल्ह्याचा NAQUIM अहवाल यशस्वीरित्या जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीना यांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी कॉन्फरन्स हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे प्रस्तुत करण्यात आला. हा अहवाल केंद्रीय भूमिजल बोर्ड, मध्य क्षेत्र नागपुरचे वैज्ञानिक अश्विन आटे व अभय निवासरकर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अहवालाचे खूप कौतुक केले आणि हा अहवाल जलसंधारण आराखडा तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी उपयोगी पडेल असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीच्या पाण्याचा उपयोग करून शेती करण्यावर जास्त भर दिला. या बैठकीमध्ये जीएसडीए चे भूजल वैज्ञानिक पण उपस्थित होते व अहवालची एक प्रत जिल्हाधिकारी व जीएसडीएच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नक्षलचे पुरून ठेवलेले साहित्य हस्तगत करून केले निकामी.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल चिन्ह वादाच्या भोवऱ्यात नवे ट्विस्ट समता पार्टी ने केला दावा.

Comments are closed.