लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 10 जुलै – केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या व्यक्तिकरीता राष्ट्रीय पुरस्कार – 2023 करीता नामांकन व अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज / नामांकन मागविण्याच्या दृष्टीने 15 जून ते 31 जुलै 2023 या कालावधीसाठी www.awards.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज / नामांकन मागण्याच्या दृष्टीने 31 जुलै 2023 पर्यंत सदर संकेतस्थळ सुरू राहील. सदर अर्ज केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या (www.awards.gov.in) या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावे. उक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जावर सर्व मुद्याची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
हे पण वाचा :-
Comments are closed.