Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धर्मराव विज्ञान महाविद्यालयात “राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा”

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 29 ऑगस्ट : 29 ऑगस्ट 2023 रोजी हॉकीचे जादूगार पद्मभूषण मेजर ज्ञान सिंग यांचा जन्मदिन “राष्ट्रीय क्रीडा दिन “म्हणून साजरा करण्यात येते सदर कार्यक्रम राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .के. मंडल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालिका डॉ. सुनंदा पाल ह्या होत्या . मंचावर उपस्थिती म्हणून प्रा. अतुल खोब्रागडे, प्रा. कांचन धुर्वे हे होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राचार्य मनोरंजन मंडल यांनी प्रारंभी विद्यार्थ्यांना फिट इंडियाची शपथ देण्यात आले. नंतर मेजर ज्ञान चंद सिंह यांचे जीवन कार्य व हॉकी खेळाबद्दलचे उल्लेखनीय कार्य विशद करताना म्हणाले की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिकत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक तरी खेळात भाग घेऊन पुढे यायला पाहिजे व आपलं जीवन घडवायला पाहिजे. प्राध्यापिका डॉक्टर पाल यांनी सांगितले की जीवनामध्ये खेळाचे महत्व अतिशय महत्वपूर्ण आहे खेळ खेळल्याने माणसांमध्ये शारीरिक विकासासोबत बौद्धिक, मानसिक विकास होत असतो त्याचप्रमाणे सामाजिक संबंध व आनंद सुद्धा मिळत असतो अशा प्रकारचे मार्गदर्शन राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केले .कार्यक्रमाचे संचालन प्रा. रमेश हलामी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. अतुल खोब्रागडे यांनी मांडले. कार्यक्रमाला यशस्वी करिता प्रा. शामल विश्वास प्रा. कांचन धुर्वे तसेच सचिकांत गावंडे, हेमचंद तिघरे, दुलाल बाचर , राजू हडपे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.