Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय महामार्ग व सर्विस रोडवरील अतिक्रमीत ईमारती हटविण्यासाठी व फुटपाथ करीता हॉकर्स झोनसाठी वंचितने केला रास्तारोको आंदोलन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 गडचिरोली, 29 ऑगस्ट : गडचिरोली शहरातील प्रमुख चारही राष्ट्रीय महामार्गावरील व सर्विस रोडवरील अतिक्रमीत सर्व ईमारती हटविण्यासाठी व फुटपाथ धारकांकरीता हॉकर्स झोन निर्माण करण्यासाठी प्रशासनाला अल्टिमेटम देऊन प्रशासन कानाडोळा करीत असल्याने काल दिनांक २९ ऑगस्ट रोजी बारा वाजेपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतिने रास्तारोको आंदोलन करण्यात आले, यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आले होते, दरम्यान चारही रोडची वाहतूक अर्ध्यां तासासाठी रोखून धरण्यात आल्याने वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, महिला जिल्हाध्यक्ष पज्ञा निमगडे, महिला नेत्या मालाताई भजगवळी, शकुंतला दुधे, शोभाताई शेरकी, कवडू दुधे, क्रिष्णा शेंडे, मुकेश डोंगरे, विपीन सूर्यवंशी, वासुदेव मडावी, अनामिका पठाणअंसारी आदि कार्यकर्त्यासहीत शेकडो आंदोलकांना डिटेन करण्यात आले.

शहरात अरुंद रस्ता व सर्विस रोड अभावी अपघाताचे प्रमाण वाढले असून गेल्या एक दिड वर्षात घडलेल्या अपघातात निष्पाप सात लोकांचा बळी गेला त्याला केवळ फुटपाथ जबाबदार नसून महार्गाच्या रस्त्यावर व सर्विस रोडवर अतिक्रमण करून मोठमोठ्या ईमारती बांधून व्यवसाय थाटणारे सुद्धा तितकेच जबाबदार असल्याने अतिक्रमण हटाव मोहिम राबवून रस्त्यावरील सर्व ईमारती पाडून व सर्व रस्ते खुले करण्यात यावे यासाठी २७ जुलै रोजी जिल्हाधिकारी, राष्टीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता, नगर रचना अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नगर परिषद मुख्याधिकारी या सर्व अधिका-यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु दुस-याच्या जीवाची पर्वा न करणारे मस्तावलेले अधिका-यांनी जन भावनेला व रास्त असलेल्या मागणीला केराची टोपली दाखविल्याने झोपेचा सोंग घेतलेल्या अधिका-यांना जागे करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी बोलतांना बाळू टेंभुर्णे म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राष्ट्रीय महामार्गाची रुंदी तिस मिटरची असतांना सुद्धा शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून त्याची रुंदी चोविस मिटर करण्यात आली आहे तरी परंतु चारही रोडवर चोविस मिटर ऐवजी ब-याच ठिकाणावर चोविसपेक्षा कमी रुंदीच्या रोडचे बांधकाम करण्यात आले आहे, शहर आराखड्यात चारही रोडच्या दोन्ही बाजूला बारा मिटरचे रस्ते आहेत ते सर्व रस्ते अतिक्रमणाने गायब झाले आहेत, बिल्डींग लाईनचे नियम पाळल्या गेले नसल्याने शहर विकासाचा बोझबारा वाजला आहे याला संबंधीत उदासीन अधिकारीच कारणीभूत आहेत असा आरोपही बाळू टेंभुर्णे यांनी केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

येणा-या आठ दिवसात प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा कोर्टात रिठ याचीका दाखल करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले, रास्ता रोको आंदलनात वंचित बहुजम आघाडीच्या शेकजो कार्यकर्त्यासहीत फुटपाथधारक सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा :-

Comments are closed.