Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोविड बाबत गडचिरोली जिल्हयात स्टेज ३ नुसार नवीन आदेश जारी

उद्यापासून दुकाने ४.०० वा.पर्यंतच सुरू, सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही मर्यादा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २७ जून : शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर जिल्हयातही स्टेज ३ नूसार कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत उद्या दि.२८ जून पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लेखी आदेश आज जारी केले आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वा.पर्यंत सुरू ठेवता येतील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अत्यावश्यक सेवा, कृषि विषयक सेवा दुकाने संपुर्ण आठवडाभर सुरू राहतील तर उर्वरीत सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद असतील. याच बरोबर सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभाकरीता फक्त ५० लोकांच्या उपस्थितीला मंजूरी असेल. शाळा महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतू शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हयातील आठवडी बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. शासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीची मर्यादा देण्यात आली आहे.

रेस्टॉरेन्ट, उपहारगृह सोमवार ते शुक्रवार चे सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत ५० % डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. तथापि इतर वेळेस पार्सल/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल. सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत सुरु असेल.मात्र पार्क गार्डन बंद असतील.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खाजगी कार्यालये हे सोमवार ते शुक्रवार चे सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असेल. खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती- ५० % उपस्थितीसह सुरु ठेवता येईल. याहून अधिक उपस्थिती गरजेचे असेल तर संबंधित विभाग प्रामुख्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांची पूर्वपरवानगी घ्यावी. सोमवार ते शुक्रवार चे सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत तर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत आऊटडोअर क्रीडा विषयक बाबी सुरू ठेवण्याची मुभा असेल. सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन इ. ठिकाणची गर्दीबाबत सोमवार ते शुक्रवार चे सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत कोविड-१९ निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल.

विवाह कार्यक्रम कोविड-१९ निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून एकूण ५० लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. अंत्यविधी कोविड- १९ अधिन राहून एकूण २० लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. स्था.स्व.संस्था व सहकारी संस्था यांचे बैठका व निवडणुकाबाबत- कोविड-१९ निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत सुरू ठेवण्याची मुभा असेल. बांधकाम-सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत प्रत्यक्ष बांधकामस्थळावर कामास मुभा असेल परंतु कामगारांना दुपारी ४.०० वाजेनंतर काम करण्याची परवानगी नसेल. कृषी विषयक सेवा, दुकाने- सोमवार ते रविवार चे सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत १९ निर्देशाचे अधिन राहून सुरू ठेवण्याची मुभा असेल.

ई-कॉमर्स ‘साहित्य व सेवा’- नियमितपणे सुरु असतील. जमावबंदी/संचारबंदी-सायंकाळी ५.०० ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत एकत्रितरित्या ५ हून अधिक लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव असेल. व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इ.- सकाळी ७.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत कोविड-१९ निर्देशाचे अधिन राहून ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था- १०० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येणार तथापि सदर वाहनांमध्ये आसनव्यवस्थे व्यतिरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल.

हे देखील वाचा :

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘श्र्वास पुन्हा घेण्यासाठी’ चे प्रकाशन

मराठा – ओबीसी आरक्षण आणि नवा राजकीय संघर्ष

 

 

Comments are closed.