Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

6 सप्टेम्बरला ‘सर्च’ रुग्णालयात त्वचाविकार व मुत्राविकर ओपीडी

 तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

 गडचिरोली, 5 सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात ०६ सप्टेम्बर २०२३ दर महिन्याचा पहिला बुधवार रोजी त्वचाविकार व मूत्रविकार  ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. शरीरावर पांढरा चट्टा कोड  व खाज,  मुरूम/ तारुण्यपिटिका, केस गळती,कोंडा होणे, गजकर्ण, खरूज, सोरायसिस, नखांचे आजार तसेच नागिन ही लक्षणे असल्यास त्वचाविकार ओपीडी मध्ये उपचार सुविधा उपलब्ध आहे तर मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज,किडनी स्टोन/मुत्रखडा व लघवीमधून रक्तस्त्राव होणे ही लक्षणे असल्यास मूत्रविकार ओपीडीचे आयोजन केले आहे.

 तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व उपचार सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.