Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे कृषी मेळाव्याचे आयोजन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०४ जुलै २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदर मेळाव्यास मौजा आवलमारी चे सरपंच सुनंदाबाई कोडापे, उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार आवलमारी चे पोलीस पाटील मनोहर पागडे, व्यंकटापूरचे पोलीस पाटील बाबुराव झाडे, लंकाचेन चे पोलीस पाटील शामराव कुळमेथे, इतर गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कृषी मेळाव्या करिता आंबेझरा, लंकाचेन, कर्नेली, चिन्नावट्रा, पेद्दावट्रा, व्यंकटापूर व आवलमारी येथील बहुसंख्य महिला, पुरूष, मुले उपस्थित होते. या सर्व नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग व वन विभाग, इ. विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपापल्या विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली व संबंधीत योजनांचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहीत केले.

यावेळी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या अडचणी सोडवण्याकरिता संबंधीत विभागांना सुचना दिल्या. सदर कृषी मेळाव्या करिता एस. बी. वाघमारे तालुका क षी पर्यवेक्षक अहेरी यांनी पारंपारीक पदधतीने शेती न करता आधुनिक पदधतीने शेतीचे फायदे, फळबागा लावुन आपले आर्थीक जोपासना करण्याचे आवाहन केले. उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांचे हस्ते सदर कृषी मेळाव्याचे औच्युत्य साधुन सदर कृषी मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना आंबा, चिंच, पेरू, पपई इ.चे झाडे वाटप करून सदर फळ झाडाचे जतन करण्याचे आवाहन केले. तसेच हददीतील नागरीकांना कोणतीही समस्या असो अहेरी हेल्पलाईन नंबर ७८८७३१३६७६ वर फोन करून आपली समस्या सोडवण्यासाठी पोलीस विभाग तात्काळ आपली मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कृषी मेळाव्यास सर्व गावांचे पोलीस पाटील व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. व्यंकटापूर येथल मदनय्या आत्राम यांनी गेले अनेक वर्ष एकटयाने अंग मेहनत करून कोणत्याही सरकारी मदतीशिवाय शेततळे बांधले आहे. व उप विभागीय पोलीस अधिकारी सा.यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व सरकारी मदत मिळुन देण्याचे आश्वासन दिले.

जनजागरण मेळावा यशस्वी करण्याकरिता उप पो.स्टे. व्यंकटापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद कुंभार, पोउपनि अनिल चव्हाण, एसआरपीएफचे पोउपनि तायडे सा. व सर्व पोलीस कर्मचारी यांनी कृषी मेळाव्याचे आयोजन करून सदर जनजागरण मेळावा यशस्वीरित्या पार पाडला.

 हे देखील वाचा :

विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड धक्काबुक्की, भाजपच्या 12 आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन

पोलिस हवालदाराची (वाहनचालकाची) धारदार चाकूने गळा कापून हत्या!

धक्कादायक!! फोनवरून शिवीगाळ केली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन युवकांच्या डोक्यात दगड घालून केला खून!

Comments are closed.