Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुजोर रेती माफिया वर महसूल विभागाची धडक कारवाई…स्थानिक अधिकारी मात्र मुग गिळून गप्प..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मनोर प्रतिनिधी 2 फेब्रुवारी :- महसूल विभागाच्या आदेशानंतर वैतरणा नदीपत्रात अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे उघड झाले. या अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या एका मुजोर रेती माफियांवर महसूल विभागाने कारवाई करत त्याला चांगलाच दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे हा रेतीमाफिया स्थानिक महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची “स्पेशल व्यवस्था” करत असल्यामुळे याच्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नव्हती. मात्र पालघर जिल्हाधकारी कार्यालयाने याची गंभीर दखल घेऊन त्याला चांगलाच झटका दिला आहे.

पालघर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी रेती व्यवसायाला शासनाची परवानगी होती. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायावर आपली उपजीविका करत होते. मात्र शासनाने धोरण बदलल्यामुळे रेती व्यवसाय करणारे अनेक तरुण देशोधडीला लागले. मात्र आजही काही तरुण रोजगारसाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे रेतीचा व्यवसाय करतात. परंतु यामध्ये व्यावसायिकांपेक्षा तलाठी आणि मंडळ अधिकारी, तसेच स्थानिक पोलीस, आरटीओ यांचेच उखळ पांढरे होत आहे. तर काही अधिकाऱ्यांचे “वसुली एजंट” म्हणून काम करणारे मुजोर व्यावसायिक प्रतिस्पर्धी व्यावसायिकांची “टीप” देऊन त्यांच्यावर कवाई केली जात होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारवाई करण्यात आलेला हा मुजोर रेती माफिया हा स्थानिक महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची “स्पेशल व्यवस्था” करत असल्याचा आणि त्यांच्यासाठी “वसुली” करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे या वसुली एजंटावर हे अधिकारी मेहेरबान असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नव्हती. या रेतीमाफियावर स्थानिक महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष प्रेम असल्यामुळे त्याच्याशिवाय इतर, किंवा त्याची हुजरेगिरी न करणाऱ्या व्यावस्तिकांवरच या अगोदर महसूल विभागाकडून करवाई केली जात असल्याचेही दबक्या आवाजात बोलले जात आहे. मात्र पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने मनोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कुडे गाव परिसरात ही कारवाई केली आहे. या मुजोर रेती माफिया कडून जवळपास दीड लाखांचा दंड वसूल केला आहे. मात्र यावेळी देखील स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे कारवाईबाबत हात आखडता घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.