पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: तो आवाज माझ्या मुलाचा नाही! अरून राठोड च्या आईचा खुलासा…
- पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे काहीच संबंध नसून ते एकमेकांना वेळखतही नसल्याचा अरुण च्या आई ने केला खुलासा!
- घराला लॉक असल्याच्या कारणावरून अरूंच्या घरात झाली लाखो रुपयांची चोरी!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड, दि. १५ फेब्रुवारी: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे.
पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव आल्यानंतर अरुण आणि त्यांचं कुटुंब बेपत्ता झालं होतं. त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, काही दिवसानंतर अरुणचे कुटुंबीय आज गावात आले आहेत. मात्र, अरुण अजूनही बेपत्ता आहे. तो कुटुंबासोबत आलेला नाही. त्यामुळे अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल केला जात आहे. या विषयी अरुण ची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी या बाबद खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आई ला देखील माहीत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले
अरुण राठोडच्या घरात झाली लाखोंची चोरी
अरुणचं कुटुंब आज घरी आल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. घराच्या गेट चे लॉक तुटलेले होते, घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं त्याच्या कुटुंबीयांना दिसलं. कुटुंबीयांनी घराची झाडाझडती घेतल्यावर घरातून लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं.येत्या 25 तारखेला अरुनच्या बहिणीचे होते लग्न. याची तैयार म्हणून घरात ऐवज होता असा खुलासाही या वेळी अरूणच्या आई मीराबाई यांनी केला.घरात लाखोंची चोरी झाल्याने राठोड कुटुंबीयांच्या संकटात झाली वाढ
Comments are closed.