Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा

कार्यालय प्रमुखांनी जबाबदारीपूर्वक फॉर्म भरून घ्यावे

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : अत्यावश्यक सेवेतील (Essential Services) अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या दिवशी (20 नोव्हेंबर, 2024) कर्तव्यावर असल्याकारणाने मतदानापासून वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये टपाली मतपत्रिकेची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी विहित नमुना 12D ची मागणी करून त्यांचेकडून भरून घ्यावेत. भरलेले फॉर्म टपाली मतपत्रिकेचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, यांचेकडे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावे. यासाठी प्रत्येक कार्यालयात नोडल ऑफीसरची नेमणूक करण्यात यावी.
कार्यालयाकडून फॉर्म १२-डी सादर न केल्याने मतदानाच्या अधिकारापासून कोणी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची राहिल असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.