Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि.1 मार्च : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपूरी, येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.         

याप्रसंगी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.पी. मेहंदळे, नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य गहाणे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या मेळाव्यात इलेव्हेट रिअल इस्टेट चंद्रपूर, वैभव एंटरप्रायजेस नागपूर, परम स्किल ट्रेनिग इंडिया औरंगाबाद, जयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपूरी, उषा कन्स्लटंसी नागपूर, नवकिसान बायोप्लॅणेटिक लिमीटेड, एलअॅंडटी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिग इस्टीटयुट पनवेल मुंबई, उत्कर्ष स्मॉल फायनांस बॅक नागपूर, आक्स फर्स्ट एचआर डेस्क चंद्रपूर , स्टॉप कॅन्सर मिशन नागपूर , विविआर फायंनेशिअल सर्विसेस, चंद्रपूर आदी कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने एकुण 362 उमेदवारांनी नोंदणी केली.

त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड कंपनीमार्फत अप्रेंटिस ट्रेनी, मोटार मेकॅनिक मार्केटिग एक्झ्यिक्युटीव, टेलीकॉलर, असिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळया पदाकरीता प्राथमिक निवड करण्यात आली असून पूढील निवड प्रक्रिया कंपनीच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटक रुगंठा म्हणाले, चंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी असून या जिल्हात कॉपर, गोल्ड, ग्रॅनाइट आदी खनीजे मुबलक प्रमाणात आहे. हा जिल्हा कृषी सधन असून सुजलाम, सुफलाम असल्याचे ते म्हणाले. 

मेंहेदळे यांनी उमेदवारांना एकत्रित येवून उद्योजक बनावे याबाबत मार्गदर्शन केले. तर सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती दिली.  

प्रास्ताविक मुकेश मुंजनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सिद्धांत रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : 

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी

5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन

 

Comments are closed.