Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इयत्ता १०वी व १२ वी च्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 19 सप्टेंबर :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या १०वी-१२वी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १२वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी, तर १०वी ची परीक्षा २ मार्चला सुरू होणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेले सविस्तर संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.शाळा,कनिष्ठ महाविद्यालये आणि विध्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विध्यार्थाच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.हे संभाव्य वेळापत्रिकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परिक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा आणि महाविद्यालयाना कळविण्यात येईल, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.तसेच या वेलपत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांचे आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात.असेही राज्य मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पोलीस भरतीसाठी वाढीव ५ टक्के गुण अन्यायकारक

Comments are closed.